जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही- मा.डिंगबर महाले

दोन दिवसीय वक्ता विकास कार्यशाळेचा समारोप
अमळनेर (प्रतिनिधि )-संत,महापुरुषांनी माणूस ,समाज घडविण्याचे कार्य केले आहे.जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही.समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी असावी.समाज जागृती, समाज प्रबोधन व्हावे समाज घडविण्यासाठी वक्ता होणे आवश्यक आहे.”वाचाल तर वाचाल,बोलाल तर टिकाल” म्हणून जीवनात चांगला वक्ता होण्यासाठी वाचन, मनन,चिंतन करावे असे प्रतिपादन

मंगळ ग्रह सेवा संस्थान अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्तरावरील व्हाईस ऑफ मिडिया संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डिंगबर महाले सर यांनी केले.
धनदाई महाविद्यालयातील यशवंत सभागृहात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विचार मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, प्रा.डॉ. लिलाधर पाटील हे या दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक होते.
मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक करतांना दोन दिवशीय वकृत्व कार्यशाळेबाबत प्रा.अशोक पवार यांनी भूमिका मांडली.
यावेळी संदीप घोरपडे, रामेश्वर भदाणे, चंद्रकांत देसले, बापूराव ठाकरे ,प्रेमराज पवार, वैशाली शेवाळे, संजय सूर्यवंशी, जयाराम पाटील ,चेतन जाधव, अजय भामरे, सोपान भवरे, गौतम मोरे ,प्रा.राहुल निकम, मिलिंद निकम व विद्यार्थी वक्ते उपस्थित होते.
या कार्यशाळेत डिगंबर महाले सरांनी वक्त्याने पूर्वतयारी, प्रारंभ, दाखला, संदर्भ, चढ, उतार, हावभाव, शेरोशायरी, चारोळी, अचूक वेळ नियोजन तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्यात या टिप्स दिल्या.प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी सर्व विद्यार्थी वक्त्यांना मार्गदर्शन करून प्रभुत्व असलेल्या विषयावर भाषण केलेल्या आराखड्याचे निरीक्षण, परिक्षण करुन त्यात भर घालणारे मुद्दे सुचविले. रामेश्वर भदाणे सर यांनी भाषणात जोशपूर्ण वीर रस असलेल्या वाक्यातील चढउतार नमुना समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बापूराव ठाकरे यांनी केले.