कामगार दिनानिमित्त एरंडोल पालिका कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

एरंडोल (प्रतिनिधि) नगरपालिकेने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे औचित्य साधून नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सवयी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. एरंडोल नगरपालिकेच्या एकूण 80 कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपदा मित्र म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षित युवक व युवतीचा सन्मान करण्यात आला तसेच सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जनास नगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक सतीशजी गोराळे, प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेंद्र ठाकूर सुखकर्ता फाउंडेशन एरंडोल होते. वैद्यकीय असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुधीरजी काबरा , डॉक्टर सुयश पाटील, डॉक्टर संदीप गांगुर्डे , डॉक्टर अमोल पाटील समुदाय आरोग्य अधिकारी, डॉक्टर राधिका पालवे समुदाय आरोग्य अधिकारी, शाहिद मुल्लाजी प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा , महालॅब ची टीम,केशव ठाकूर आरोग्य सेवक, पुनम धनगर, योगिता परदेशी धनगर परिचारिका ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांनी प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करून कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या बाबतीत जागृत केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत सूर्यवंशी , डॉक्टर नरेंद्र ठाकूर यांचे सहकार्य लाभले.तसेच प्रमुख मार्गदर्शन मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन हितेश जोगी यांनी केले तर आभार डॉ.अजित भट यांनी मानले. कार्यक्रमास एरंडोल नगर पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.