विद्युत खांबावरून पडलेल्या तरुणाचा मृत्यू..

जरंडी ( साईदास पवार ) सोयगाव येथील हृषिकेश विष्णु बागले ( वय २५ ) हा महावितरण विभागात कंत्राटी कामगार पद्धतीने काम करीत असे. हृषिकेश हा दि.३० रोजी सोयगाव शहरातील वाल्मीक मंदिर परिसरातील वादळी वाऱ्यामुळे खांब वाकून तुटलेल्या तारा सरळ करण्यासाठी विद्युत खांबावर चढून दुरुस्ती करित असताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता त्यास जळगांव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दि.3 बुधवारी सकाळी १०.५५ ला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सायंकाळी ६ वाजता सोयगाव येथील स्मशान भूमीत त्याचेवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ व वहिनी असा परिवार आहे.लाईट च्या कामामुळे सर्वांना परिचित असलेल्या ऋषिकेश च्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सोबत मयत ऋषिकेश बागले चा फोटो