सोयगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अत्यवस्थ; राजीनामे देण्याच्या तयारीत;शहराध्यक्ष रवींद्र काळे यांची माहिती…

सोयगाव, (साईदास पवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचे विधान करून पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या मुळे सोयगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या मध्ये अत्यवस्थ झाले असून शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी राजीनामा देण्याचा तयारीत असल्याची माहिती शहराध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिली आहे
सोयगाव सह तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार साहेबांच्या या निर्णयामुळे अत्यवस्थ झाले असून हा निर्णय साहेबांनी त्वरित मागे घ्यावा या समर्थना साठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोयगावात राजीनामा सत्राच्या तयारीत आहे त्यामुळे शहरात राजकिय गोटात खळबळ उडाली असून पक्षाचे कार्यकर्ते उदासीन झाले आहे दरम्यान बुधवारी शहराध्यक्ष रवींद्र काळे यांचेशी याबाबत संपर्क साधला असता शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजीनामा देण्यासाठी हालचाली सुरू आहे जिल्ह्याचे जेष्ठ नेते राजेंद्र अहिरे सुधाकर सोहनी महिला आघाडीच्या अध्यक्ष अनुराधा पठाडे सुधीर पठाडे आदी यावेळी उपस्थित होते……..