हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून गरीब व गरजूं पर्यंत सेवा पोहोचवा – -आमदार चिमणराव पाटील…

प्रतिनिधी – एरंडोल
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा आपला दवाखान्याच्या माध्यमातून गरीब व गरजूंपर्यंत याचा लाभ पोहोचवा असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
आपला दवाखान्याचा उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
शासनातर्फे सुरु झालेल्या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन एरंडोल नगरपालिकेचे जुने कार्यालयात आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाला जिल्हा शिवसेना प्रमुख वासुदेव पाटील,तालुका प्रमुख रवींद्र जाधव,युवा सेना प्रमुख बबलू पाटील,माजी नगरसेवक नरेंद्र पाटील,मयूर महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार म्हणाले ज्यांच्याकडे पैसा नाही आरोग्यासाठी खर्च उचलू शकत नाही अशा लोकांसाठी हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून मोफत उपचार व औषधी, गरीब व गरजू लोकांना सेवा पुरवल्या जाणार आहेत.या दवाखान्याच्या माध्यमातून याच ठिकाणी सेवा जर अपूर्ण पडली तर स्पेशलिस्ट पर्यंत रुग्णांची सोय या दवाखान्याच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले. ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दवाखाने उघडुन त्याठिकाणी गरीब व गरजू नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सेवा दिली जात असल्याचे सांगुन आपणही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य सुविधाच्या माध्यमातून चांगली सुविधा देऊ व उपचारा पासून कोणी ही वंचित राहता कामा नये अशा सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.देशात आरोग्याचे प्रमाण वेगळे असून यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याकडे सदर दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील याप्रसंगी त्यांनी सांगितले. शहरात अजून पुरे भागात ही लवकर अशी आरोग्य सेवा सुरू होणार असल्याचे ही यावेळी ते म्हणाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. तर प्रस्ताविक डॉ.जतिन बाविस्कर यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी आरोग्य सेवक सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन केशव ठाकूर यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी देवदत्त अग्निहोत्री,सतिष महाजन,प्रविण सोनवणे, मृग्णाली पाटील यांनी प्रयत्न केले.