दफनभूमीची जागा तत्काळ मुस्लीम बांधवांना हस्तांतरीत करण्याची मागणी मनपा मुख्यालयासमोर आंदोलन…

0


नाशिक (प्रतिनिधी)
शहरातील जुने नाशिक मुस्लीम समाजाला जुने नाशिक येथील नानावली भागातील तसेच वडाळा गावातील कब्रस्तानची आरक्षित जागा महापालिकेने मुस्लीम समाजाकडे तत्काळ हस्तांतरीत करून दफनविधी करायला परवानगी द्यावी , अशी मागणी करण्यात आली . या मागणीसाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले . अजीज पठाण , शेखन खतीब , हनिफ बशीर , सलीम राजमोहम्मद मुस्ताक शेख , नदीम मनियार , जभी मुजाहिद , यांच्या उपस्थित मनपा आयुक्तांना एक हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले . नाशिक महानगर क्षेत्राची मुस्लीम समाजाची लोकसंख्या ३ लाखाच्या जवळपास आहे . स्वातंत्र्यानंतर नाशिक शहरातील मुस्लीम समाजासाठी क शासनातर्फे अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत फक्त दसक शहर , नाशिकरोड येथे एकमेव दफन भुमीची जागा देण्यात आलेली आहे . या शिवाय इतर ठिकाणी कोठेही जागा देण्यात आलेली नाही . मुस्लीम समाजास दफनभूमीची जागा तत्काळ ताब्यात मिळवी , अशी मागणी करण्यात आली . अडीच वर्षांपासून या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले . हा प्रश्न तत्काळ मागी न लावल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला . आंदोलनात टिपू रझा , निझाम शेख , फहीम शेख , सचिन गायकवाड , अकील शेख , कासिम शेख , नियाझ आली सय्यद , नदीम मणियार , शकील तांबोळी , आसिफ बॉस , इमरान तांबोळी , आझम खान , इमरान पठाण , मुख्तार शेख इब्राहिम अत्तर , माजिद पठाण , तबरेज देशमुख , मुस्ताक शेख , फहीम शेख , अहमद काजी , कय्यूम शेख , रफिक शेख , शाम गायकवाड आदींसह मुस्लीम बांधव उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!