एरंडोल कॉलेज पतपेढीला अ वर्ग दर्जा प्राप्त……
एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाच्या पगारी नोकरांची सहकारी पतपेढी ची वार्षिक सभा १ मे २०२३ रोजी खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न झाली.२०२२-२३ या वर्षाच्या लेखापरीक्षणात पतपेढीला “अ “वर्ग मिळाल्याबद्दल कॉलेजचे अध्यक्ष अमित पाटील यांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. चेअरमन सोमनाथ बोरसे यांनी पतपेढीच्या प्रगतीचा व कामाची माहिती सभासदांना दिली. या आर्थिक वर्षात पतपेढीला झालेल्या नफ्यातून पंधरा टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात आला. यावेळी चेअरमन सोमनाथ बोरसे व सेक्रेटरी प्रल्हाद घरटे यांचा सत्कार करण्यात आला.
सभेला प्राचार्य डॉक्टर ए.जे. पाटील ,डॉ. अरविंद बडगुजर प्रा. किशोर वाघ, प्रा.स्वाती शेलार, प्रा. नरेंद्र गायकवाड, शेखर पाटील नितीन पाटील व सर्व सभासदागर हजर होते.