महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्र.क्रं.१९मध्ये १०० फुटी,शब्बीर नगर व २०००वस्ती परिसरात काँक्रिट रस्ता तयार करणे.शब्बीर नगर ते शालिमार हॉल,शाहिद बर्तनवाले ते ३५ खोलीपावेतो रस्ता काँक्रिट करणे कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न..

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही. गटारी नाही,पाईप लाईन नाही. यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे.शब्बीर नगर,२००० वस्ती आणि शालिमार हॉल परिसरातील नागरिकांची प्रचंड परवड होत होती.नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियानअंतर्गत प्र.क्रं.१९मध्ये १०० फुटी,शब्बीर नगर व २०००वस्ती परिसरात काँक्रिट रस्ता तयार करणे.शब्बीर नगर ते शालिमार हॉल,शाहिद बर्तनवाले ते ३५ खोलीपावेतो रस्ता काँक्रिट करण या कामासाठी ८० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचे आज आ.फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शालिमार हॉल च्या मागे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आ.शाह यांच्या सोबत नगरसेवक आमिर पठाण,प्यारेलाल पिंजारी,मौलाना शकील,निजाम सय्यद,कैसर अहमद,इकबाल शाह,रफिक शाह पठाण,माजीद पठाण,हलीम शमसुद्दिन, माजीद काझी,आसिफ शाह, रईस शाह, इंजि. अफसर शाह, शहजाद मिर्झा,अजहर सैय्यद,मुकतार शेख, मुनाफ शेख,अफजल शेख,अमीन शेख,सत्तार शेख,सलमान शेख, महेमुद शेख,सरफराज अन्सारी,रफिक खाटीकरस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी यांनी समाधान व्यक्त केले आणि आ.फारुख शाह यांचे आभार मानले.