संभाजी ब्रिगेड व लायन्स क्लब तर्फे नेत्रदान राजासाठी या उपक्रमाचे आयोजन.

अमळनेर (प्रतिनिधि) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व लायन्स क्लब अमळनेर यांच्या वतीने शनिवार १३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता ढेकू रोड येथील फोर्ट्स या ठिकाणी नेत्रदान राजासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ.राहुल मुठे यांनी नेत्रदाना विषयी माहिती दिली तसेच प्रा.डॉ.लीलाधर पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या पराक्रमी इतिहासाची आठवण करून देणारे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जयवंत आबा पाटील ( अध्यक्ष – अमळनेर तालुका मराठा समाज ) , नानासो.मनोहर पाटील ( मराठा सेवा संघ ) , डॉ.मिलिंद नवसारीकर , सौ.वसुंधरा लांडगे ( विश्वस्त – खा.शिक्षण मंडळ ) , शिवाजीराव पाटील ( बामसेफ ) , तुषार सांवत ( जिल्हाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड , जळगाव ) , संदीप पाटील ( महानगराध्यक्ष – संभाजी ब्रिगेड , जळगाव) , मयूर चौधरी ( उपजिल्हाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड , जळगाव ) यावेळी १०० पेक्षा जास्त लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करत नोंदणी करून दिली सूत्रसंचालन दयाराम पाटील सर यांनी व प्रास्तविकात कार्यक्रमाचे आयोजक श्याम पाटील यांनी यापुळे नेत्रदान अभियान राबविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच किरण पाटील ( तालुकाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड , अमळनेर ) यांनी आभार व्यक्त केले…!