रेल्वे प्लटफॉर्म वर फूड स्टॉल सुरु करण्याची मागणी..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर रेल्वस्थानका वर बंद स्टॉल या संदर्भात बग्गा यांनी म्हटले आहे की अमळनेर स्थानकावरील प्लॅटफ फॉर्मवर असलेले खाद्य पदार्थांचे स्टॉल नवीन टेंडर न निघाल्याने बंद असून प्रवाश्यांना काही खायचे असल्यास किंवा पाणी हवे असल्यास मोठी अडचण होते, सद्यस्थितीत कडक उन्हाळा सुरू असल्याने अत्यंत आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नाही, प्रत्यक्षात प्रवाश्यांना मोफ्फत पाणी उपलब्ध करणे रेल्वेची जवाबदारी असून मोफ्फत सोडा विकत देखील पाणी उपलब्ध नसल्याने हे योग्य नाही तरी, पिण्याच्या पाण्याची सोय करून बंद असलेले फुड स्टॉल लवकर सुरू करावे अशी मागणी बग्गा यांनी केली आहे.