पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार विशेष बसेस सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा..

24 प्राईम न्यूज 16 May 2023आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरला जाता यावे, यासाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. २५ जून ते ०५ जुलै या कालावधीत या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जून रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते..