लाचखोर तलाठी एसिबी च्या जाळ्यात..

24प्राईम न्यूज 17 May लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्रं.१२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. सदर शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १,३०,०००/-रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले असता सदर कार्यालयात उपस्थित वर नमुद खाजगी इसम यांनी तक्रारदार यांना माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो असे सांगुन सदर कामासाठी तक्रारदार यांच्या आईचे तक्रारदार व साक्षीदाराचे आधारकार्ड झेरॉक्स व आईचे ३ व तक्रारदार यांचे २ यासपोर्ट फोटो सांगितले.व सदर खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देण्याच्या मोबदल्यात
१,३६०/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आरोपी यांनी बांबरुड येथील त्यांचे स्वतःचे घरी पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी-
PI श्रीमती.एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. सापळा पथक
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
कारवाई मदत पथक
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.