कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकूण वैध मतदानापैकी एक दशांश पेक्षा कमी मते मिळालेल्या १६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. सेवा सोसायटी मतदार संघात अरुण बाबूराव देशमुख (१४), गणेश महादेव पवार (२३), नारायण पितांबर पाटील (१५), भटू विक्रम पाटील (२५), संदेश गंभीरराव पाटील (२१), ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (५), रमेश व्यंकट बोढरे (१०), नामदेव पांडुरंग महाले (८), राजेंद्र मला माळी (१७), सरला चंद्रकांत जगदाळे (११), प्रतिभा रवींद्र पाटील (३९), अर्जुन माधवराव पाटील (२१), हिरामण साहेबराव पाटील (१७), ग्रामपंचायत मतदारसंघात सुखदेव श्रावण गव्हाणे (२१), जतनबाई दशरथ पाटील (९), अमोल रमेश पाटील (२) यांची अनामत रक्कम जप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील यांनी दिली.