महसूल विभागाची मोठी कारवाई. अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक; १५ वाहने जप्त

0

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर महसूल विभागातर्फे अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या १५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनधारकांना ७ लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाची नोटीस देण्यात आली आहे. ही वाहने पोलिस स्टेशनला जमा करण्यात केली आहेत. तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी ही नोटीस बजाविली. यापैकी तीन वाहनांनी दंड भरल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.

गोपाळ किसन पाटील यांचा टेम्पो (एम. एच. ०५ ए.जी. ६३८१) संदीप जगन्नाथ पारधी यांचे ट्रॅक्टर (एम. एच. १९ सी. जे. १४०२), ट्रॉली (एम.एच.१९ ५९५८) राहुल काशीनाथ शिंपी यांचे टेम्पो (एम. एच. ०२, एच. ए. ६२६५) 1 भूषण दीपक धनगर यांचा टेम्पो (एम. एच. ०५, ११२२), जयेश युवराज पाटील यांचा लाल रंगाचा विनानंबरचा टेम्पो,

ललित कैलास पाटील (एम. एच. ०१ एल. ए. ३०३३), मुनाफ पठाण यांचे ट्रॅक्टर (एम एच १९, बी. जी. ५४०) ट्रॉली (एम. एच. १९ इ ३४२३), विश्वास संतोष पाटील यांचे ट्रॅक्टर (एम. एच. १९, बी.जी. ६४०२), अकबरखा युसुफखा पठाण यांचे ट्रॅक्टर (एम. एच. २१ ए. डी. ३७८५), भय्या शांताराम पाटील यांचे ट्रॅक्टर (एम. एच. १९, ए. एल. ४४६०), आकाश शिंपी यांचे ट्रॅक्टर (एम. एच. १९ सी. इ. १६७६), धनराज मधुकर पाटील यांचा विनानंबर टेम्पो, हेमंत राजेंद्र पवार यांचे ट्रॅक्टर (एम. एच. १९, सी. यू. १७४७), शेख वहाब गफूर यांचा टेम्पो (एम. एच. ०२, बी ९९०७), मुकद्दर अली जोहर अली (एम. एच. ०२ वाय. ३४८१) या वाहनांना अवैध वाळू वाहतूक व गौण खनिज वाहताना तलाठी पथकाने रंगेहाथ पकडून वाहने पोलिस ठाण्यात जमा केली आहेत.

Hello Jalgaon Gramint

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!