महाराष्ट्रात पाऊस कधी? पंजाबराव डख यांनी सांगितल्या तारखा…

24 प्राईम न्यूज 28 May 2023 हवामान अभ्यासक पंजाबराव डख आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. तसेच पाऊस कुठं पडतो याची बरीच माहिती उदाहरणांसह सांगितली. जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे म्हणाले. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी

सांगितले.
पुढे बोलताना डख म्हणाले की, मी फक्त शेतकऱ्यांचा हितासाठी हवामानाचा अंदाज सांगून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठी व पुढील नियोजनासाठी सांगत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले आहेत.. त्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असेही पंजाबराव डख म्हणाले.