चोपडाचे आमदार लता सोनवणे व चंद्रकांत सोनवणे यांचा गाडीला अपघात..

24 प्राईम न्यूज 28 2023 May आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात ते किरपोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा.

चंद्रकांत सोनवणे हे आज आपल्या वाहनाने चोपडा तालुक्यातील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असतांना करंज गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारला एमएच १९ झेड ६२४५ क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. यात कारचे नुकसान झाले असून सोनवणे दाम्पत्यासह कारच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही.