३१ एम एम लांबीचा सुळा दात एरंडोलमध्ये सुरक्षीत काढला…

वैद्यकिय क्षेत्रात कौतूक
एरंडोल (प्रतिनिधि) कासोदा-एरंडोल येथील या ६५वर्षीय वृद्ध रुग्णाचा वरचा सुळा दात जो ३१ एम एम एवढ्या लांबीचा होतो, तो एरंडोलच्या तरुण डाक्टरने यशस्वीरित्या न तूटता काढला आहे, साधारणपणे दात हे २५ किंवा २६ एम एम एवढ्याच लांबीचे असतात,त्यामुळे हा दात सुरक्षीत काढल्यामुळे वैद्यकिय क्षेत्रात या डाक्टरचे कौतूक होत आहे.
एरंडोलच्या राजमल बिर्ला यांना दाताचा त्रास होत असल्याने ते एरंडोलच्या मोरया क्लीनिक मध्ये उपचारासाठी गेले होते,सर्वसाधरण दात हे २५किंवा २६एम एम एवढ्याच लांबीचे असतात,पण या रुग्णाचा वरचा दात सुळा या प्रकारात मोडणारा होता,डोळा आणि नाक यांच्या मध्ये व मेंदूशी संबंधीत जागेवर असल्याने हा दात काढणे अत्यंत जिकरीचे होते, परंतू मकरंद पिंगळे या तरुण डाक्टरने हा दात अत्यंत काळजीपूर्वक न तूटता सुरक्षीतपणे काढण्यात यश मिळवले आहे.या आपरेशनची चर्चा झाल्यानंतर या डाक्टरचे सर्वत्र कौतूक होत आहे. डा.पिंगळे हे कासोदा येथील सेवाभावी डाक्टर पी.जी.पिंगळे यांचे सुपूत्र आहेत.
–३७ एम एम एवढ्या लांबीचा दात जर्मनीत काढल्याचा जागतिक विक्रम आहे,३२एम एम काढल्याचा भारतातील बडोदा शहरातील विक्रम आहे,हा दात देखील अजून मोठ्या लांबीचा असता पण वयामानानुसार तो घासला गेल्यामुळे ३१ एम एम एवढीच त्याची लांबी उरली होती.– डा.मकरंद पिंगळे एरंडोल
—–हा दात मेंदूशी संबधित असतो, ३१एम एम या मोठ्या लांबीचा दात काढणे जिकरीचे असते,मकरंदने तो यशस्वीरित्या काढला,एवढ्या लांबीचा दात शक्यतो नसतो–पुनम पाटील, अध्यक्षा डेंटल असोशिएशन जळगाव .
— हा जास्त एम एमचा दात काढणे मोठे काम आहे,डाक्टरने तो यशस्वीरित्या काढला त्यांचे कौतूक आहे.–संपदा गोसावी,जिल्हाध्यक्ष मौखिक आरोग्य, सामान्य रुग्णालय जळगाव.