नविन वसाहती मधील रहिवाशांचे आमदारांना निवेदन.

एरंडोल (प्रतिनिधी ) एरंडोल येथील श्रीराम कॉलनी, रामदास कॉलनी व विद्युत कॉलनी परिसरातील रहिवाशांनी नुकतेच आमदार चिमणराव पाटील व मुख्याधिकारी विकास नवाळे यांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात आमच्या तिनही कॉलनी परिसरात पक्के रस्ते,गटारी, हाय टेन्शन इले.पोल,ओपन स्पेस वर बगीचा,कंपाऊंड व समाज मंदिर अशा सुविधा उपलब्ध करुन द्यावे तसेच आमच्या तिघ कॉलनी या फार जुन्या असुन देखील अन्य ठिकाणी नगर पालिकेतर्फे विविध मुलभूत सुविधा मिळत आहे परंतु आम्हाला या सुविधा का मिळत नाही असा प्रश्न विचारला आहे आम्ही नियमित नगर पालिकेचा कर भरणा करत असूनही आम्हाला मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे म्हटले आहे.याप्रसंगी श्रीराम कॉलनी, रामदास कॉलनी व विद्युत कॉलनी परिसरातील रहिवासी उपस्थित होते.