एनसीसी प्रशिक्षण शिबिरास अमळनेरात सुरुवात..

अमळनेर( प्रतिनिधि)
येथील प्रताप महाविद्यालयात दि.२६ मे ते ४ जून असे दहा दिवसीय प्रशिक्षण सुरू झाले आहे. प्रशिक्षणात धुळे, जळगाव व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील शालेय तथा महाविद्यालयीन ४९२

प्रशीक्षणार्थी उपस्थित आहेत. प्रशिक्षणास ७ एएनओ,१० पीआय स्टाफ, ०४ जेसीओ व १ सैनिक अधिकारी प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणास सकाळी साडे पाच ला सुरुवात होऊन पिटी,योगा, ड्रिल,मॅप रीडिंग,शस्त्रास्त्र प्रशिक्षण,आरोग्य प्रशिक्षण, पर्यावरण रक्षण असे रात्री दहापर्यंत सर्व प्रशिक्षण सुरू असतात. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होऊन मुलं झोपतात. वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी एक कॅम्प व बटालियन द्वारे चार ते पाच कॅम्प होतात. यातून काही विद्यार्थ्यांची थलसेना कॅम्प, प्रजासत्ताक कॅम्प व परेडसाठी निवड केली जाते. त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी तयार केले जाते.एनसीसीच्या ए.बी.सी.प्रमाणपत्र परीक्षेची तयारी करणे,सैनिक भरतीचे विविध प्रशिक्षण देणे,समाज सेवा करणे, आपत्कालीन सेवेसाठी तयारी करणे, पर्यावरण रक्षण करणे, राष्ट्रीय एकात्मता या विषयावर या प्रशिक्षणात सखोल मार्गदर्शन केले जाते. दहा दिवसीय एनसीसी प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची सर्व शारीरिक व मानसिक तयारी कॅम्प कमांडर कर्नल समीर बोडस, डिप्ती कॅम्प कमांडर लेफ्टनंट प्रमोद चौधरी,सेकंड आँफीसर मनिष सोनवणे,कॅम्प कोर्टरमास्टर कृष्णा कोळी, ट्रेनिंग ऑफिसर अमोल वाणी,सीटीओ विशाल साव, सुभेदार मेजर एस.एम. परमवीर सिंग,सुभेदार जयवीर सिंबा,बी.एच.एम. हवालदार अनिल शिखरवार, सुभेदार सन प्रकाश, हवालदार शांताराम पाटील, सुभेदार तिवारी,हवालदार मंगेश सोनवणे, हवालदार प्रदीप डोंगरे,हवालदार संदीप राणा हे प्रशिक्षण आहेत. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता सुनील सोनार, व्ही. के. सूर्यवंशी करीत आहेत.प्रताप महाविद्यालयाचे कॅम्पच्या सर्वांनी आभार मानले आहेत.

