नाशिक येथील सप्तशृंगी मंदिरातील पादुका चोरी करणारा चोरटा अमळनेर पोलीसांच्या जाळ्यात..

अमळनेर (प्रतिनिधि)
नाशिकच्या पंचवटीतील सप्तशृंगी मंदिरात राञी चोरट्यांनी चोरी उद्देशाने मंदिरात शिरून दि 26/5/2023 सप्तशृंगी मंदिरातील पादुका चोरी करून आपले गैरकृत्य बाहेर येवु नये व पोलीस आपल्याला पकडु नये या उद्देशानेच चोरट्याने त्याच दिवशी कुणालाही

कळण्याआधीच नाशिक शहर सोडून देऊन अमळनेर या ठिकाणी येऊन मजुरीवर कामास जावु लागला.
तिकडे पंचवटी पोलीस स्टेशनला भाग 5 गु र न 27/5/2023रोजी 269/2023 भा द वि 380 प्रमाणे दाखल झाला व सदर चोरी मध्ये लोकांच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्याने नाशिक पोलीस देखील सदर आरोपींच्या शोधात असतांना चोरटा हा घरातील फरशी बसविण्याच्या कामात निष्णात असल्याने त्याने अमळनेर शहरातील फरशी बसवणारे ठेकेदार यांचे कडेस कामास रोजंदारीवर काम करु लागला.
परंतु अमळनेर पोलीसांनी मागील काही महीन्या पासुन शहरातील गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवुन असल्याने
अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना खबर्याने खबर दिली की अमळनेर शहरातील विश्वकर्मा मंदिरा शेजारी मजुरी कामासाठी नाशिक येथील किशोर चव्हाण रा उत्तरप्रदेश नामक अट्टल चोरटा हा नाशिक शहरात पंचवटी परिसरातील सप्तशृंगी मंदिरात चोरी करून अमळनेर शहरात लपून बसला असून तो रोज विदेशी दारु पिऊन मौजमस्ती करत आहे अशी बातमी मिळाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भटुसिंग तोमर,मिलिंद भामरे,सुनील हटकर,कपिल पाटील, जितेंद्र निकुंभे यांना सदर इसमाचा शोध घेऊन ताब्यात घेण्यास सांगीतल्यावर सदर पोलीस पथकाने दि 31/5/2023 रोजी राञी 1 वाजेच्या सुमारास खाञी झाल्यावर त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणले व विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने मी नाशिक येथील सप्तशृंगी मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
नाशिक पंचवटी पोलिसांना मंदिरात चोरीच्या घटनेतील चोरटा अमळनेर पोलिसाच्या ताब्यातून घेऊन जाण्या बाबत नाशिक पोलीसांशी संपर्क साधून त्यास ताब्यात देण्यात आले आहे.