साहिल ला फाशी तर इंडिक टेल्स व महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व भारताचे गृहमंत्री यांना मुस्लिम शिष्टमंडळातर्फे तीन मागण्याचे निवेदन देण्यात आले व त्या मागण्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
जळगाव (प्रतिनिधि) निवेदनातील तीन मागण्या
१) इंडिक टेल्स या वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अवमान कारक लेख लिहून प्रसिद्ध केले त्या कंपनीवर ,लेखकावर व
त्यास प्रोत्साहित करणाऱ्या मास्टरमाईड वर गुन्हा दाखल करून कारवाई करा.
२) महाराष्ट्र सदन दिल्ली येथे महापुरुषांचे पुतळे ज्या अधिकारी व राजकीय व्यक्तींनी महापुरुषांचा अवमान केला त्याप्रकरणी गुन्हे नोंद करा.
३)दिल्ली येथे सोळा वर्षे मुलीची एकतर्फी प्रेमात भर रस्त्यात हत्या करणारा साहिल यास न्यायालयाद्वारे तीस दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देण्यासाठी तज्ञ अशा वकीलाची नेमणूक करा.

या तिन्ही प्रकरणाचा मुस्लिम शिष्टमंडळाने निषेध व्यक्त केला व महापुरुषांचा अपमान करणारे तसेच आई बहिणीच्या इज्जतीशी खेळून अन्याय व अत्याचार करून जीवे ठार मारणारा व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारले
निवेदनाचे तिन्ही विषय महिलेशी संबंधित असल्याने व अहिल्यादेवी ची जयंती असल्याने सदर निवेदन उप जिल्हा अधिकारी श्रीमती शुभांगी भारदे यांना देण्यात आले त्या वेळी अपर जिल्हा अधिकारी प्रवीण महाजन साहेब उपस्थित होते.
शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
फारुख शेख, अध्यक्ष मणियार बिरादरी, सैयद चांद अध्यक्ष, कुळज, मझहर खान अध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग,
फीरोज शेख, अध्यक्ष हुसेनी सेना, वसीम खान अब्दुल पेट्रोलियम यांची उपस्थिती होती.
फोटो
उप जिल्हा अधिकारी शुभांगी भरदे यांना निवेदन देताना मजहर पठाण सोबत अपर जिल्हा अधिकारी प्रवीण महाजन ,फारुक शेख,सैयद चांद,अन्वर खान ,फिरोज शेख, मुजाहिद खान आदी दिसत आहे..