लहान बालकांना त्वरित मदरसा किंवा पालकांना सोपवा – विभागीय सुरक्षा आयुक्त रेल्वे यांच्याकडे मागणी…

जळगाव ( प्रतिनिधि )
भुसावळ रेल्वे स्थानक येथे बिहार कडून सांगली येथे अरबी मदरसा मध्ये अरबी शिक्षण घेण्या साठी जात असलेल्या २९ मुलांना शिक्षकासह रेल्वेतून उतरवून त्यांना जळगावच्या रिमांड होम मध्ये ठेवल्याने तसेच सर्व माध्यमात लहान मुलांची तस्करी अशा आशयाची बातमी प्रसारित झाली
लोहमार्ग भुसावळ पोलिसांनी सुद्धा भा द वि 370 प्रमाणे शिक्षक मोहम्मद अंजर यांच्यावर गुन्हा नोंदवला मुळे त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली असली तरी सदर प्रकरणी आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी आवश्यक ती चौकशी करावी अशा आशयाची मागणी जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मझहर खान,मुस्लिम इदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शाह,जमियत उलमा हिंद चे हाफिज रहीम पटेल,भुसावळ येथील नगरसेवक इम्तियाज शेख आदींनी भुसावळ रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
निवेदनातील मागण्या १)मुलांची तस्करी होत असल्या बाबत च्या वृत्ताचा आम्ही निषेध करीत आहोत.
२)लहान मुलांना पोलिसांनी पोलीस गणवेशात, पोलीस स्टेशन मध्ये आणून त्यांची विचारपूस केली त्यांनी आपले आधार कार्ड दाखवून सुद्धा तसेच त्यांच्याकडे असलेले अधिकृत रेल्वेचे रिझर्वेशन तिकीट असताना सुद्धा त्यांना आपला प्रवास पूर्ण करू न देता मध्येच उतरवून भुसावळ ते जळगाव पोलीस व्हॅन मध्ये त्यांना अक्षरशा कोंबून जळगाव आणले त्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला असल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच मुलांकडे अधिकृत आधार व पालकांचे फोन क्रमांक असताना सुद्धा त्यांना रिमांड होऊन मध्ये न ठेवता त्वरित मदरसा मध्ये त्यांची रवानगी करण्यात यावी यांचे निवेदन देण्यात आले.
विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी फारुक शेख यांना आश्वासित केले की सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल.