गाव दरवाजाला दिले अहिल्याबाईंचे नाव.. अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी..

प्रवेशद्वारावर दिले अहिल्याबाई होळकर नाव
महापुरुषांच्या तैलचित्राने सुशोभित केले प्रवेशद्वार
अमळनेर ( प्रतिनिधि)चोपडाई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत नविन गाव दरवाजाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्यात आले, व दरवाज्याचा एका बाजूस छत्र
पती शिवाजी महाराजांचा फोटो फ्रेम व दुसऱ्या बाजूस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो फ्रेम बसवण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित मा. आ. स्मिताजी उदय वाघ, मा. पं. समिती सभापती धुळे प्रा. विजय पाटील सर, मोर्या क्रांती संघटना उपाध्यक्ष बन्सीलाल आण्णा, सामाजिक कार्यकर्ते डी. ए. धनगर सर, एस सी तेले सर, कृषि .उत्पन्न्न . बा. समितीचे संचालक समाधान भाऊ धनगर, रमेश धनगर, गणेश धनगर, पं. समिती माजी सभापती अमळनेर बापुसौ. श्यामजी अहिरे, मा. जि. प.

सदस्य संदीप दादा पाटील, रवि भाऊ धनगर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रा. सोपान मासुळे सर यांनी केले प्रस्तावना उपसरपंच सुनिल भाऊ मासुळे यांनी केली व ग्रामपंचायत सदस्य भाऊलाल भाऊ वाघ यांनी आभार मानले. यावेळी प्रा विजय पाटील, बंसिलाल भागवत, शाम अहिरे, डी ए धनगर, माजी आमदार स्मिता ताई वाघ यांची यथोचित भाषणे झाली. अहिल्यादेवींनी जे लोक कल्याणकारी कामे केली त्याचा उजाडा मान्यवरांनी दिला. तसेच त्यांच्या कार्याची साक्ष आज अस्तित्वात असलेले लोकोपयोगी वास्तु आहे. तसेच त्यांनी सर्व जाती धर्मासाठी कार्य केल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील सर्व तरुण यांनी परिश्रम घेतले.