महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदलणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा..

24 प्राईम न्यूज 1 jun 2023 महाराष्ट्र सरकारने आता आणखी एका शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
राजमाता अहिल्याबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. अहमदनगर ही निजामशाही सुलतानांची राजधानी होती. निजामशाही राजघराण्याचा पहिला सुलतान अहमद निजामशाह याने 1494 मध्ये या शहराची स्थापना केली होती.
अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून भाजप नेते करत होते. अखेर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली.