प्रभाग क्रमांक ८ मध्ये ताशा गल्ली व सुलतानिया चौक ते सार्वजनिक शौचालय पर्यंत काँक्रिट रस्ता, व गटार कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे

हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही. गटारी नाही,पाईप लाईन नाही. यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ताशा गल्ली,
सुलतानिया चौकपरिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी ५० लक्ष चा निधी आ.फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला.सुलतानिया चौक येथे संपन्न झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकबाल अन्सारी, होते यावेळीआ.फारुख शाह यांचे सोबत ,नगरसेवक मुकतार अन्सारी,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,आरिफ अन्सारी,डॉ. शराफत आली,जमील अहमद,गुलाम अन्सारी,रफिक पठाण,फैसल अन्सारी,इब्राहीम पठाण,हलीम शमसुद्दिन,हासिम अन्सारी,फहीम अन्सारी,आसिफ पोपट शाह,फारुख अन्सारी,जुबेर शाह,सलमान अन्सारी,फरोग हाजी,इलियास अन्सारी,जावेद अन्सारी,आसिफ अन्सारीआदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन निसार अन्सारी,वासिम अक्रम,रिझवान हाजी अन्सारी,रियाज शाह,गोलू शाह यांनी केले तर सूत्रसंचालन निहाल अक्तर यांनी केले.