अमळनेर बस आगारातील वाहनचालक गबा बिऱ्हाडे यांना मा मंत्री गुलाबराव पाटील याच्याहस्ते उत्कृष्ट चालक सह रु२५०००/- बक्षीस..

अमळनेर (प्रतिनिधि) रा.प. महामंडळ च्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रा.प.महामंडळात ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला

नेमून दिलेले काम प्रामाणिक पणे करीत रा.प.महामंडळाचे नाव लौकिक ठेवणारे कर्मचाऱ्यांचा हि सहपत्नी सत्कार चे आयोजन करण्यात आले होते.त्यात अमळनेर आगारातील चालक गबा भाकचंद बिऱ्हाडे यांनी आपल्या २५ वर्षाहून अधिक सेवातंर्गत अपघात विरहित बजावलेल्या सेवेमुळे रा.प.महामंडळाची जनमानसात प्रतिमा उंचावली आहे.प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल त्याचा जळगांव येथे सपत्नीक मा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रक्कम रु२५०००/- चा धनादेश देऊन गौरविण्यात आले.त्याचे उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून ते जळगांव जिल्हा सह अमळनेर येथील प्रसिध्द गायक समाधान बिऱ्हाडे यांचे वडील आहेत…