मृगाच्या पावसाच्या स्वागता साठी सोयगावात वन्यप्राणी सज्ज;तीन दिवसावर मृग नक्षत्र..

जरंडी,(साईदास पवार) ता.०३…चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या मृगाच्या नक्षत्रात पेरण्या करण्यासाठी एकीकडे शेतकरी सज्ज झाले असताना दुसरीकडे मृगाच्या पावसाची सोयगावच्या जंगलातील वन्
यप्राण्यांना प्रतीक्षा लागून आहे त्यामुळे मृग नक्षत्राचे तोंडावर सोयगावच्या जंगलात वन्यप्राणी स्वागतासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र शनिवारी आढळून आले मोरांची थवेच्या थवे शेत शिवारात मुक्त संचार

करून बागडू लागले होते तर हरिणांचे कळप रस्त्यावर आल्या ने शेतकऱ्यांना मृगाचे सूचक संकेत देत असल्याचे चित्र सोयगाव च्या जंगलात दिसून आले आहे
फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाची होरपळ सहन करणाऱ्या वन्यप्राणी च्या कळप शनिवारी झालेल्या बदलत्या वातावरणात मुक्त संचार करतांना मृगाच्या नक्षत्राचे स्वागत करत होते दरम्यान शेतकऱ्यानी खरीप पूर्व केलेल्या मशागतीच्या शेतात वन्यप्राणी मुक्तपणे संचार करून मृगाच्या पावसाचे स्वागत करत होती चार महिन्यापासून या वन्यप्राण्यांच्या कळपनी उन्हापासून संरक्षण करत भुयार धरले असून शनिवारी मात्र या वन्यप्राण्यांच्या कळपनी थेट मुक्त जागेत संचार केला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता वन्यप्राणीही मृगाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे
—–शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे
सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामाची पूर्वतयारी केली असून बी बियाण्यांची जुळवून करून आता मृगाच्या पेरण्या साठी सज्ज झाली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची डोळे आभाळाकडे लागली असून वन्यप्राणी ही मृगाच्या पहिल्या च पावसात सुखवण्यासाठी सज्ज झाली आहे…..