जिल्हा परिषदेचे शिक्षण घेवून मिळविले ९४ टक्के; बनोटीतांड्यातून सुप्रिया ची जिद्द पूर्ण..

–बनोटी तांड्याची सुप्रिया चव्हाण तालुक्यातील द्वितीय…
जरंडी,(साईदास पवार) ता.०३…पाचशे लोकवस्ती असलेल्या तांड्यात राहून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेवून माध्यमिक शालांत परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या सुप्रिया ने जिल्हा परिषदेच्या शिक्षणात असलेली जादूची किमया दाखवून दिली आहे बनोटी तांड्यातून शाळेत जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध नसतांनाही या विद्यार्थिनी ने शिक्षणाची कास धरून दहावीचे शिक्षण पूर्ण करून यश मिळवून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या धडे गिरवत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे
बनोटी तांड्याची सुप्रिया चव्हाण ही शेतकरी कुटुंबातील पण तिने सध्याच्या युगात शिक्षणाच्या बाजारी करणाला बळी न पडता जिल्हा परिषदेच्या बनोटी च्या प्रशालेतच शिक्षण सुरू ठेवले जिद्द मनाशी बाळगून शाळेत मिळणाऱ्या बाळकडू च्या आधारावर तिने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला शाळेत मिळणाऱ्या तुटपुंज्या पुस्तकीय ज्ञानावर सुप्रिया हिने ज्ञानाचे डोस घेवून इयत्ता दहावीच्या अभयासाची सातत्य सुरू ठेवून तिने यश गाठले आहे पाचशे लोकवस्ती असलेल्या बनोटी तांड्याची सुप्रिया मालखान चव्हाण हिने तालुक्यावर तिचे व जिल्हा परिषदेच्या शाळेचे नाव गोंदविले त्यामुळे तालुका भर सुप्रिया चव्हाण चे कौतुक होत आहे..