हम अपने बच्चो को लिये बगैर नही जायेगे … बिहार येथील पालकांचे बाल कल्याण समितीला अश्रूने साकळे..

जळगाव ( प्रतिनिधि)
मानव तस्करी या खोट्या आरोपाखाली दाखल भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशन गुन्ह्यातील जळगाव बाल गृहात दाखल २९ बालकांचे पालक यांनी बाल कल्याण समिती समक्ष आवश्यक ते सर्व कायदेशीर कागदपत्र घेऊन हजर झाले व आपले लेखी म्हणणे सादर करून आमच्या मुलांचा ताबा आम्हास द्या अन्यथा
आम्ही येथून जाणार नाही असे बोलून ढसा धस रडू लागले असता समितीने त्या सर्व पालकांना आप आपल्या पाल्यानी भेटू दिले परंतु प्रत्यक्ष ताबा दिला नाही.

कायदेशीर प्रक्रिया व सामाजिक संघटना चा सहभाग
नैसर्गिक पालक असल्याने त्या बालकांचा ताबा पालकांना द्या म्हणून एडवोकेट अकील इस्माईल, जळगाव व एडवोकेट
ऐहतेशाम मलिक,भुसावळ तसेच जळगाव व भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख,मझहर खान, मुफ्ती हारून नदवी, फिरोज शेख, अन्वर खान तर भुसावळचे मुजाहिद शेख, फिरोज शेख, हाजी पिंजारी, इम्तियाज शेख आदींनी भेट घेऊन त्यांना लेखी विनंती केली परंतु त्यांनी बाल काळजी कायद्यानुसार मुलांचा ताबा बिहार येथील बालकल्याण समितीकडे देऊ तेथून त्यांनी मुलांना आपल्या ताब्यात घ्यावे असे आदेश दिले.
आदेशाविरुद्ध अपील करणार- फारुक शेख
बालकल्याण समितीच्या आदेशाविरुद्ध जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे बाल सुरक्षा अधिनियमा प्रमाणे अपील करण्याचे अधिकार असल्याने सोमवारी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे नियमानुसार सामाजिक संघटना व पालकांतर्फे अपील दाखल करण्यात येईल.
मुले व पालका मध्ये काही वेळेसाठी आनंद
जेव्हा मुले आपल्या पालकांशी भेटली व त्यांच्याशी प्रत्येकाने दहा ते पंधरा मिनिट चर्चा केली त्यावेळी ती लहान बालके अत्यंत आनंदी होती परंतु जेव्हा भेटीची वेळ संपली तेव्हा बालक व पालक हे दोन्ही अक्षरशा रडत होते.
जळगाव मधील मदरसा मध्ये पालकांना दिलासा
या सर्व पालकांना जळगाव येथील मदरसा अनवारुल उलम येथे आणून त्यांची जेवणाची सोय व्यवस्था केली व नंतर त्यांच्याशी मदरसा प्रमुख कारी अकिल,अक्सा मशीदचे प्रमुख मौलाना सलिक सलमान जे मूळचे बिहार येथील आहे, एडवोकेट पिरजादे व फारुक शेख यांनी त्या पालकांना दिलासा दिला व कायदेशीर प्रक्रिया समजून सांगितली. आपल्या बालकांचा ताबा लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी शाश्वती दिली.