सोयगाव तालुक्यात चक्री वादळाचा तडाखा;,झाडे उन्मळून आडवी;मॉन्सून पूर्व पाऊस—

0


जरंडी (साईदास पवार) दि.०४…सोयगाव सह तालुक्यात रविवारी दुपारी चक्री वादळासह मॉन्सून पूर्व पाऊस झाल्याने सोयगाव तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले दरम्यान सोयगाव तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे हवेत उडून शेतातील अंथरलेल्या ठिबक सिंचन च्या नळ्या गायब झाल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा मनस्ताप झाला आहे दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात घरांवरील पत्रे मोठ्या प्रमाणात उडाली आहे सोयगाव-बनोटी रस्त्यावर झाडे उन्मळून आडवी झाली असून जरंडी गावाजवळ झाडे आडवी झाल्यानें सोयगाव-बनोटी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान सोयगाव जरंडी माळेगाव पिंप्री गलवाडा कंकराळा निंबायती बहुलखेडा निमखेडी उमर विहिरे तिखी घोसला आदी गावातील घरांवरील पत्रे हवेत उडाली त्यामुळे अनेकांची संसार उघड्यावर आली असून रस्ता दुतर्फा झाडे उन्मळून पडली आहे
सोयगाव शहरात वादळाचा मोठा फटका बसला असून शहरात विष्णू सांडू मनगटे, ईश्वर सांडू मनगटे व सुरेश लक्ष्मण मनगटे यांच्या घरांवर झाड कोसळून घरांचे नुकसान झाले आहे यामध्येविष्णू मनगटे यांच्या घराची पत्रे वाकली , भिंतीला तडे गेले आहे जरंडी माळेगाव पिंप्री कंकराळा आदी गावातही घरांची मोठं नुकसान झाले आहे महसूल विभागाने सोयगाव तालुक्यातील नुकसानी ची माहिती संकलित केली आहे दरम्यान चक्री वादळी वाऱ्याचा रविवारी सोयगाव तालुक्याला मोठा तडाखा बसला आहे तासभर झालेल्या चक्री वादळाचा फटका शेतातील हंगामीपूर्व मशागती च्या कामांना बसलेला असून शेतातील ठिबक च्या नळ्या गायब झाल्या आहे दरम्यान धनवट शिवारात धनवट येथील गट न 87अ सबिरखा मुनीरखा पठाण यांचे आज झालेल्या वादळी वाऱ्याने घरा शेजारची डी पी जळाल्याने दोन बैल व एक वासरू जखमी झाले आहे महसूल विभागाने नुकसानी चा पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर. केला आहे….दरम्यान जरंडी आणि कंकराळा या दोन्ही गावात पन्नास च्या वर घरांवरील पत्रे उडाली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!