पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान.

अमळनेर( प्रतिनिधी )
आज अमळनेर तालुक्यात वादळी वारासह पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला काही भागांमध्ये मोठमोठे कोलमडून गेले तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आज दि.४ जून रोजी प्रचंड वादळामुळे पातोंडा येथिल शेतकरी संगिता खेमराज बोरसे यांच्या गट न ३६५ मधील शेतातील सौर कृषी पंपाचे प्लेट्स ४० ते ५० फूट अंतरावर उडून गेल्याने सदर सौर पंपाच्या प्लेट्स फुटून नुकसान झाले असून शासनाने त्वरित नुकसानभरपाई दयावी अशी मागणी शेतकरी संगीता बोरसे यांनी केली आहे.