अंतूर्ली रंजाने येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान..

शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी
अमळनेर (प्रतिनिधी)
आज अमळनेर तालुक्यात रविवारी चक्री वादळासह मान्सून पूर्व वादळी पाऊस झाल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळत झाले काही भागांमध्ये मोठमोठे झाड कोलमडून गेले तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रचंड वादळामुळे अंतुर्ली-रंजाणे ता. अमळनेर, येथील शेतकरी श्री. सुभाष पोपट पाटील यांच्या शेतातील गट नं. ५१ रंजाणे शिवारातील सोलर पॅनलचे नुकसान झालेले असून सोलर पॅनल्या हेट फुटलेल्या आहेत. शेतातील सौर कृषी पंपाचे प्लेट्स उडून गेल्याने सदर सौर पंपाच्या प्लेट्स फुटून नुकसान झाले असून शासनाने त्वरित नुकसानभरपाई दयावी अशी मागणी शेतकरी श्री सुभाष पोपट पाटील यांनी केली आहे.