“त्या” बालकांना बिहार बाल कल्याण समिती कडे त्वरित पाठवा -जिल्हा दंडाधिकारी मित्तल यांचे आदेश..

जळगाव ( प्रतिनिधि) भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीसांनी मौलाना अंजर सह २९ मुलांना ताब्यात घेऊन त्या बालकांना जळगावच्या बालकल्याण समिती कडे स्वाधीन केले होते समितीने त्या बालकांची रवानगी बाल सुधार गृह मध्ये केली होती.
सदर बालकांचा ताबा घेण्यासाठी त्यांचे पालक जळगावी आले असता बालकल्याण समितीने त्या बालकांचा ताबा दिला नसल्याने पालकांच्या वतीने जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे जळगाव जिल्हा मानियार बिरादरी या सामाजिक संघटनेतर्फे फारूक शेख यांनी अपील दाखल केले होते.
जिल्हा दंडाधिकारी यांनी बाल कल्याण समिती समक्ष पालक व अर्जदार फारुक शेख यांची सुनावणी घेऊन त्या बालकांविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद नाही तसेच त्या बालकांना घेऊन जाणाऱ्या मौलाना कडे आवश्यक ते सर्व संमती पत्रक सह मदरसा सांगलीचे पत्र असल्याने जिल्हा दंडाधिकारी यांनी या २९ बालकांचा ताबा त्वरित बालकल्याण समिती अररिया यांच्याकडे द्यावा असे आदेश केले व स्वतः अररिया जिल्हा अधिकारी यांचेशी चर्चा करून पालकांना दिलासा दिला.
पालकांनी साजरा केला आनंदोत्सव
जिल्हा दंडाधिकारी याच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातच जळगाव चे सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख,फिरोज शेख, मझहरखान,अनिस शहा, मुजाहिद खान,मोहसीन युसूफ,अल्ताफ शेख,फझल कासार, समीर शेख ,सय्यद अजहर सह भुसावळचे माजी नगरसेवक मुन्ना इब्राहिम तेली यांनी त्या सर्व पालकांना पेढे खाऊ घातले.
पालकांनी सुद्धा ईश्वराचे आभार मानून जळगाव व भुसावळ येथील मुस्लिम मंच चे मुजाहिद शेख,फिरोज शेख, हाजी पिंजारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.