जरंडीचे ग्रामसेवक यांना हर घर नर्सरी पुरस्कार; मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरण..

जरंडी, (साईदास पवार)दि.०५….हर घर नर्सरी उपक्रमात उत्कृष्ठ कार्य करून ऐन उन्हाळ्यात पंधरा हजार वृक्षांची लागवड व संगोपन करून स्वतंत्र नर्सरी तयार केल्या बद्दल ग्रामसेवक सुनील मंगरूळे यांना सोमवारी जागतिक पर्यावरण दिनी उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ विकास मीना यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा पुरस्कार दिला आहे
सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील मंगरूळे यांनी ग्रामपंचायत स्तरावर नर्सरी उभारणी करून पंचवीस हजार वृक्षांची नर्सरी करून गावस्तरावर वृक्षांची लागवड व संगोपन केले या शासनाच्या हर घर नर्सरी २०२३ या उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल त्यांचा जागतिक पर्यावरण दिनी सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ विकास मीना यांनी जरंडी ग्रामपंचायत साठी विविध विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले या पुरस्काराचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक विस्तार अधिकारी बी टी साळवे सरपंच वंदनाबाई पाटील उपसरपंच संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील दिलीप पाटील आदींनी अभिनंदन केले आहे…