चक्री वादळात सोयगाव तालुक्यात अनेकांचा संसार उघड्यावर-प्रशासन झोपेतच..

0


जरंडी,(साईदास पवार) ता.०५….सोयगाव सह तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या तासभरच्या चक्री वादळात सोयगाव तालुक्यातील ३४ गावांना जबर फटका बसला आहे या चक्री वादळात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली तर काही घरे कोसळली यामध्ये जीवितहानी झालेली नाही परंतु रविवारची रात्र अनेक कुटुंबांना उघड्यावर काढावी लागली आहे रविवारी झालेल्या घटनेनंतर सोमवारी सायंकाळ पर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी व तलाठी गावस्तरावर फिरकलेच नव्हते त्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांनी सोमवारी घरे दुरुस्ती चे कामे हाती घेतले होते दरम्यान सोमवारी महसूल व कृषीच्या एकही कर्मचाऱ्यांनी ग्रामस्तरावर भेटी दिल्या नसल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे
सोयगाव तालुक्यात रविवारी चक्री वादळाचा तडाखा बसला यामध्ये ३४ गावात मोठे नुकसान झाले आहे परंतु गाव तलाठ्यांनी केवळ फोन वरून गावातील पंटर कडून माहिती घेवून त्या चुकीच्या माहितीच्या आधारे प्राथमिक अहवाल सादर केला आहे यामध्ये नुकसान झालेल्या खऱ्या लाभार्थ्यांच्या नावेच समाविष्ट नाही त्यामुळे घरे कोसळून नुकसान झालेल्या व पत्रे उडालेल्या नागरिकांना मदतीला मुकावे लागणार आहे महसूल च्या प्राथमिक अहवालात सोयगाव तालुक्यात केवळ तीन गावात घरे कोसळल्या चे नमूद करण्यात आले आहे प्रत्यक्षात मात्र माळेगाव पिंप्री जरंडी निंभोरा बनोटी गोंदेगाव निंबायती बहुलखेडा घोसला आदी गावात घरे कोसळले आहे पत्रे उडालेल्या गावांची संख्या ३४ आहे परंतु तलाठ्यांनी स्थानिक पंटर च्या माध्यमातून चुकीची माहिती प्रशासनाला पुरविली आहे
—-माळेगाव पिंप्री गावात चक्री वादळात अख्या गावातील घरांची पत्रे उडाली आहे परंतु अद्यापही संबंधित तलाठी यांनी भेट दिली नसल्याची माहिती उघड्यावर संसार थाटलेल्या मिलिंद पगारे यांनी सांगितले
—-केळी पिकांनाही वादळाचा फटका बसलेला आहे किन्ही शिवारात केळी पिकांची मोठे नुकसान झाले आहे परंतु तालुका कृषी विभाग अद्यापही नुकसान स्थळी पोहचला नव्हता
कोट—,सोयगाव तालुक्यात वादळाचा मोठा फटका बसलेला असल्याची माहिती मिळालेली आहे मंगळवारी यावर आढावा बैठक घेण्यात येत आहे मंडळ अधिकारी व तलाठी कृषी सहायक यांचेकडून वस्तुनिष्ठ नुकसान ची माहिती अवगत करण्यात येईल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!