खासदार शरदचंद्र पवार यांच्या अमळनेर दौरा नियोजन संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक स्मंपन..

अमळनेर (प्रतिनिधि)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सह माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.अजित दादा पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आ.श्री.जयंतराव पाटील साहेब यांच्या आगामी 16 जुन 2023 वार- शुक्रवार रोजी होणाऱ्या अमळनेर दौरा नियोजन संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर ची बैठक सायंकाळी 05.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे आमदार दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडली, आमदार साहेबांनी सर्व आयोजन योग्य पद्धतीने व नियोजन बद्ध व्हावे यासाठी सर्वांना अमूल्य असे मार्गदर्शन केले, सूचना केल्या व आदरणिय पवार साहेबांच्या दौरा यशस्वी व्हावा यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी असे आवाहन केले..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सर्व सेलचे अध्यक्ष व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शेतकी संघ प्रशासकीय सदस्य मंडळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, व्हॉईस चेअरमन, संचालक मंडळ आदी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.!