एरंडोलला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लोकशाही साम्राज्य दिवस सोहळा संपन्न..

एरंडोल ( प्रतिनिधी ) लोककल्याणकारी, रयतेचे, शेतकर्यांचे राजे, भारत देशाचे वैभव, लोकशाहीचे निर्मातेछत्रपती शिवरायांचा 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित लोकशाही साम्राज्य दिवस सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस आमदार चिमणराव आबा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवतिर्थावरील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने, प्रा. मनोज भाऊ पाटील, पीएसआय बागल, मुख्याधिकारी विकास नवाळे, संभाजी आबा देसले, गजानन पाटील, समाधान पाटील, आर. डी. पाटील, के. डी. पाटील, जगदीश पाटील, डॉ. किरण पाटील, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, मोहन चव्हाण, चिंतामण पाटील, शिवदास महाजन, डॉ. भुषण पाटील, राजेंद्र शिंदे, निलेश पाटील, जगदीश ठाकुर, प्रा. आर. एस. पाटील, रोहीदास पाटील, तापीराम पाटील, मयुर महाजन, दिनेश महाजन, रवी जाधव, विजय पाटील, काशी म्हस्के यांचेसह परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय पाटील, स्वप्निल सावंत, हेमंत पाटील, शरद पाटील, राज पाटील, समाधान पाटील, राकेश पाटील सर यांनी परिश्रम घेतले.