एरंडोल महाविद्यालय व एरंडोल नगरपालिके मार्फत ३५० वृक्ष लागवड अभियान…

एरंडोल (प्रतिनिधि,) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने, दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच एरंडोल नगरपालिके मार्फत ३५० वृक्ष लागवड अभियान साईनगर, एरंडोल, येथे आयोजित करण्यात आले.
दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे पर्यावरण संरक्षण शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए.ए. बडगुजर, प्रा. एन. ए. पाटील, प्रा. के. जे. वाघ, एनएसएस चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही. के. गाढे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एच. एम. पाटील, डॉ. एस. एम. साळुंखे, प्रा. एस. एन. विसपुते, मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र संयोजक प्रा. नितीन पाटील व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.