सोयगाव तालुक्यात बिबट्याचा थरार;सात शेळ्यावर एकाच वेळी हल्ला; चार फस्त …तिघे गंभीर—
तिखी शिवारातील घटना..

0


जरंडी,(साईदास पवार) ता.०७….शेतकऱ्यांनी शेतातून जेवण करण्यासाठी शेत सोडताच पाळत धरून बसलेल्या बिबट्याने सात शेळ्यावर अवघ्या चाळीस मिनिटात जोरदार हल्ला चढवलायामध्ये चार शेळ्या फस्त करून तीन शेळ्यांना गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली सोयगाव जवळील तिखी शिवारातील गट क्र-७ मधील गावालगत असलेल्या शेतावर हा थरार मंगळवारी रात्री नऊ वाजता घडला आहे.याप्रकरणी बुधवारी वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून पशुसंवर्धन विभागाचे वतीने मृत चारही शेळ्यावर शवविच्छेदन केले
सोयगाव जवळील तिखी शिवारात गट क्र-०७ मध्ये दावणीला शेतकरी रमजान खान नासिर खान यांच्या सात शेळ्या बांधलेल्या होत्या दरम्यान शेतावर शेड मध्ये झोपणार्या तिघांना रात्रीचे जेवण घेण्यासाठी रात्री नऊ वाजता शेतातून घरी जाताच बिबट्याने या सात शेळ्यावर जोरदार हल्ला चढवला यामध्ये चार शेळ्या जागेवर फस्त करून तीन शेळ्यांना बिबट्या ने गंभीर जखमी केले आहे जेवण करण्यासाठी घरी गेलेले तिघे पठाण बंधू परत शेतात येताच त्यांना शेळ्यांचा फडशा पडलेला आढळून आला अवघ्या चाळीस मिनिटात चार शेळ्या फस्त करणारा एकटा बिबट्या नसून बिबट्याच्या जोडीचा हा हल्ला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे दरम्यान बुधवार( दि.०७) वनविभागच्या पथकांनी पंचनामा करून पशुसंवर्धन विभागाच्या पथकांनी शवविच्छेदन केले दरम्यान गंभीर जखमी शेळ्यावर उपचार करतांना उपचारादरम्यान बुधवरी दुपारी पुन्हा एका शेळीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे बिबट्या च्या हल्ल्यात मृत शेळ्यांचा आकडा पाच वर गेला आहे..या घटनेत पशुपालक शेतकरी रमजान खान नासिर खान पठाण यांचे सत्तर हजार रु नुकसान झाल्या चे वनविभागाच्या प्राथमिक पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे,….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!