सुरळीत वीज पुरवठ्याअभावी अधिकृत वीज ग्राहकांची शेती विज पंप जोडणी वापस घेण्याची मागणी….

एरंडोल,( प्रतिनिधि)सुरळीत वीज पुरवठा अभावी व अनधिकृत आकडेधारकांना कंटाळून विज जोडणी वापस घेण्याची अनोखी मागणी वीज मंडळाकडे अधिकृत ग्राहकांनी केली आहे.
एरंडोल;-तालुक्यातील रिंगणगाव वीज उपकेंद्रा अंतर्गत पिंपळकोठा प्र.चा. शेतशिवारातील गंगाराम बुवा डीपी ही ६३ अश्वशक्तीची असून यावर अधिकृत 12 शेती वीजपंप ग्राहक आहेत. आणि बारा अनधिकृत आकडे धारक आहेत. त्यामुळे डीपी ओवरलोड होऊन पाच पाच मिनिटात फ्युज उडणे डिवो पडणे, असे प्रकार घडत असून खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचे जेरीस आले आहेत. आता सध्या पूर्व हंगामी कापूस लागवड सुरू असून अवघ्या दोन पानांवर असलेल्या कापूस बियाण्याच्या अंकुरास लगेच पाण्याची नितांत गरज आहे. मात्र वीजच सुरळीत चालत नसल्यामुळे पूर्व हंगामी कापूस लागवड धोक्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी विज उपकेंद्रात सूचित करून देखील कुठलीही कार्यवाही अनधिकृत वीज ग्राहकांवर होत नाही. यामुळे या ट्रांसफार्मर वरील वीज ग्राहकांनी सरळ वीज उपकेंद्र गाठून एका लेखी अर्जाद्वारे “अनधिकृत वीज ग्राहकांवर कारवाई करा, अन्यथा आमची वीज जोडणी वापस घ्या” अशी अनोखी मागणी आज कनिष्ठ अभियंता रिंगणगाव विज उपकेंद्र यांना भेटून केली.
साहेबांचा अनोखा सल्ला, अधिकृतवीज ग्राहक आश्चर्यचकित
जेव्हा हे गाऱ्हाणे
घेऊन शेतकरी कनिष्ठ अभियंता उपकेंद्र रिंगणगाव यांच्याकडे गेले. तर त्यांनी चार तास अधिकृत वीज ग्राहक, व चार तास अनधिकृत वीज ग्राहक, अशी वीज वापरा. असा अनोखा सल्ला शेतकऱ्यांना दिला असुन यामुळे शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. यामुळे शेतकऱ्यांनी आमचे वीज कनेक्शन वापस घ्या अशी मागणी वीज उपकेंद्राकडे केली आहे.
आकडे टाकणारे शेतकरी वीज मागणी अर्ज भरण्यास तयार, परंतु वीज मंडळाची टाळाटाळ
यावेळी अनधिकृत वीज वापरणारे शेतकरी देखील उपस्थित होते. आम्ही वीज जोडणी घेण्यास तयार असून आम्हाला त्वरित रीतसर विजजोडणी द्या. अशी मागणी आकडेधारकांनी केली. मात्र लोड शिल्लक नसल्यामुळे आम्ही वीज जोडणी देऊ शकत नाहीत. असे वीज मंडळाने स्पष्ट केले. हा गुंता सुटायचा नाही, आणि कापसाच्या इवल्याशा अंकुराचे नुकसानही थांबणार नाही. यासाठी अधिकृत वीज ग्राहकांनी सरळ वीज जोडणी वापस घ्यावी अशी मागणी केली असून आमचे महागडे बियाणे, खते शेतीत ओतले गेले असून पाणी उपलब्ध असून देखील सुरळीत वीज पुरवठा अभावी कापसाचे अंकुर जळत असून प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पाणीपुरवठ्याची नितांत गरज भासत आहे. पिक वाया गेल्यास यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूदंड बसणार आहे. यास सर्वस्वी वीज मंडळ जबाबदार राहील. असा ही उल्लेख अर्जात करण्यात आला आहे.
आता यावर संबंधित अधिकारी काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.