प्रतिक्षा संपली –
२३ जुन ला “आधारवड” प्रदर्शित होणार…

एरंडोल ( प्रतिनिधि )
विलास मोरे यांची महत्वाची भुमिका असलेला मराठी चित्रपट ” आधारवड ” दि २३ जुन रोजी महाराष्ट्रात प्रदर्शीत होत आहे . अतुल परचुरे , सयाजी शिंदे , यांचे सोबत शक्ती कपुर , राखी सावंत , जयराज नायर यांच्या भुमिका आहेत .
राजकुमार हंचाटे, सोलापूर याची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन सुरेश झाडे , भावसार यांनी केलेले आहे . मारोती काकांच्या भुमिकेत विलास मोरे मोठ्या पडद्यावर दिसणार असुन अजुन दोन चित्रपटांचे शुटींग त्यांनी पुर्ण केलेले आहे .
रोहीत कुमार आणि समृध्दी शिमगे ही जोडी या चित्रपटाद्वारे चित्रनगरीत पदार्पण करीत आहे . वृद्धांच्या ( ज्येष्ठ नागरीकांच्या ) जीवनावर बेतलेला हा चित्रपट निव्वळ मनोरंजन नाही तर समाज भान जपणारा , सामाजिक दायीत्वाची प्रचिती देणारा असा आहे . हे कथानक पडद्यावर सादर करतांना अनेक तांत्रिक अडचणी आल्यात पण दिग्दर्शक व लेखक सुरेश झाडे भावसार यांनी कौशल्याने त्या हाताळल्याचे विलास मोरे यांनी सांगितले .
साहित्य क्षेत्रातील जोरदार घोडदौडी सोबत चित्रपट सृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पणासाठी त्यांना अनेक संस्था व व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत .