आईच्या शोधात भरकटलेल्या रोहिवर कुत्र्यांचा हल्ला;रोहिचा मृत्यू-जरंडीत हळहळ..

जरंडी,(साईदास पवार) ता.०९…आईपासून भरकटलेल्या नीलगायच्या एक वर्षीय पिलावर पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांचा कळपाने जोरदार हल्ला चढवून नीलगायला ठार केल्याची घटना सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडी जवळ शुक्रवारी दहा वाजता घडली दरम्यान कुत्र्यांचा तावडीतून परिसरातील ग्रामस्थांनी निलगायीची सुटका केली पण तासभर जखमी नीलगाय रक्ताच्या थारोळ्यात पडुन असताना वनविभागाचे पथक तासभर घटनास्थळी धावले नव्हते त्यामुळे उपचाराअभावी जखमी रोहिचा मृत्यू झाला आहे…
आईपासून दूर झालेल्या भूकेपोटी व पिण्याच्या पाण्याचा शोधार्थ नीलगायचे एक वर्षाचा नर जातीचे पिलू भरकटून जरंडी गावा जवळ आले असता सकाळी दहा वाजता गावातील पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांचा निदर्शनास हे नीलगाय चे पिल्लू पडताच मोकाट कुत्र्यांनी त्यास घेराव घालून त्याचा पाठलाग केला दरम्यान गावाच्या बाहेर सोयगाव-बनोटी रस्त्यावर कुत्र्यांनी त्या नीलगायच्या पिलाला गाठले व त्यावर जोरदार हल्ला चढवला ही घटना विष्णू वाघ नंदू महाजन आदींच्या लक्षात येताच त्यांनी लाठ्या काठ्यानी नीलगायच्या पिलाची कुत्र्यांचा तावडीतून सुटका केली परंतु तो पर्यंत मोकाट कुत्र्यांनी त्या पिलाला चांगलेच जखमी केलेले होते त्याच्या तोंडाला पायाला व पोटाला लचके घेतले त्यामुळे एका नाल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिलाला जीवदान देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी कसरत केली परंतु वनविभागा व पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी न आल्यामुळे या पिलावर उपचार होऊ शकले नाही एक तासा नंतर वनमजुर घटनास्थळी आल्यावर त्यांनी या जखमी पिलाला रामपुरवाडी या रोपवाटिका मध्ये उपचारासाठी घेऊन गेले परंतु जरंडी पशुधन वैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नसल्याने अखेरीस दुपारी दोन वाजता या जखमी नीलगाय च्या पिलांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला
—–जरंडीचे वनरक्षक सुनील हिरेकर हे घटनास्थळी आलेच नव्हते त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते वनरक्षक सुनील हिरेकर व जरंडीचे पशुवैद्यकीय अधिकारी काकडे हे दवाखान्यात गैरहजर असल्याने घटनास्थळी या जखमी पिलाला उपचार मिळू शकले नव्हते त्यामुळेच या पिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवसेनेचे विष्णू वाघ यांनी केला आहे या गैरहजर वनरक्षकावर तातडीने कारवाई करण्याची लेखी निवेदनद्वारे विष्णू वाघ यांनी उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांचेकडे दुपारी चार वाजता केली आहे
—–दरम्यान आई पासून दूर झालेल्या निलगायीच्या पिलाला आईच्या शोधा ऐवजी आई अखेर मिळालीच नसून मृत्यू च्या दाढेत जावे लागले आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे….