शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये पूल कॅम्पस ड्राईव्ह च्या माध्यमातून जिल्ह्यतील पात्र फार्मासिस्टना नौकरीची संधी.

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट मधील प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पूल कॅम्पस ड्राईव्ह च्या माध्यमातून जिल्ह्यतील पात्र फार्मासिस्टना (Registered Pharmacist) नौकरीची संधी देण्यात येत आहे. भारतातील नावाजलेली कंपनी जेनेरिक फार्मा (I) लि. यांच्या सोबत शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी यांनी मिळून जिल्ह्यतील डी . फार्म किंवा बी. फार्म पूर्ण करून महाराष्ट्र राज्य भेषजी परिषदेत (MSPCI) नोंदणी असलेल्या नवीन किंवा अनुभवी फार्मासिस्ट ला ही संधी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र फार्मासिस्ट नी ऑनलाईन अँप्लिकेशन करून मुलाखती साठी शनिवार दि. १० जुन २०२३ रोजी सकाळी १० वाजे पासून इन्स्टिटयूट उपस्थित राहावे असे आवाहन शास्त्री फौंडेशन चे अध्यक्ष डॉ विजय शास्त्री यांनी केले आहे. ऑनलाईन अँप्लिकेशन करण्यासाठी https://forms.gle/vrHnKCq4C3DdVPUp7 या लिंकचा वापर करावा. अधिक माहिती साठी इन्स्टिटयूट चे उपप्राचार्य डॉ पराग कुलकर्णी यांच्याशी संपर्क करावा, अथवा कोऑर्डिनेटर सुमेश पाटील सर याना (फोने नं. +91 88309 99717) संपर्क करा असे आवाहन कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी केले आहे .