तांबेपुरा येथून सुटका केलेली पीडित महिला बरी होऊन सुखरूप तिच्या घरी (माहेरी)..

0

अमळनेर (प्रतिनिधि) शनिवार दिनांक 3 जून रोजी येथील संरक्षण अधिकारी यांना एका महिलेला तिचा पती बेदम मारहाण करत असून तिची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा फोन आला त्यांनी आधार संस्थेतील रेणू प्रसाद यांच्याशी संपर्क संपर्क साधला व सोबत ज्ञानेश्वरी पाटील, मोहिनी पाटील अशा सर्वजणी तांबेपुरा येथे जाऊन पीडित महिलेची सुटका केली व तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने , नंतर धुळे शासकीय रुग्णालय येथे पाठविले व पोलिसांशी संपर्क करून नवर्या विरोधात केस दाखल केली ,धुळे येथील उपचारांवर तिच्या माहेरच्या परिवारातील व्यक्ती समाधानी नसल्याने तिला खाजगी दवाखान्यात उपचार मिळावे ही विनंती संस्थेकडे केली त्याचवेळी मंगळ ग्रह मंदिराचे अध्यक्ष माननीय श्री दिगंबर महाले सर यांनी आधार संस्थेच्या भारती पाटील यांच्याशी संपर्क केला आणि महिलेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च व इतर सर्व मदतीची ग्वाही दिली त्यानंतर सदर महिलेला अमळनेर येथील डॉक्टर सुमित सूर्यवंशी यांच्याकडे हलविण्यात आले .सदर पाच दिवसात महाले सर रोज रुग्णालयात भेट देऊन महिलेची चौकशी केली तसेच तिच्या परिवारातील सदस्यांना आधार दिला , आधार संस्थेच्या रेणूप्रसाद संरक्षण अधिकारी चौधरी,डॉ भारती पाटील यांनी महिलेचे तसेच कुटुंबाचे समुपदेशन केले ,आज पाच दिवसांच्या उपचारानंतर ती बरी होऊन तिला आईसोबत झाडी येथे रवाना करेपर्यंत महाले सरांनी जबाबदारी घेतली. उपचारादरम्यान डॉक्टर सूर्यवंशी यांनी देखील खूप सहकार्य केले पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वतः महिलेची उपचारादरम्यान येऊन चौकशी केली.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अशा अतिशय गंभीर प्रसंगात अनेक वेळी समाजातील हात व दाते पुढे येतात आणि सहकार्य करतात याकरिता श्रीमती रेणुप्रसाद व भारती पाटील यांनी मंगळ ग्रह मंडळ मंदिराचे अध्यक्ष श्री दिगंबर महाले सर यांचे मनःपूर्वक आभार मानले, यानंतर देखील त्या महिलेच्या मुलीच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आम्हीच घेऊ असे सरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!