प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चिघडला ..आमदारांच्या आंदोलनास विवीध पक्ष,सामाजिक संघटना,पत्रकार संघटना, व संस्थांचाही पाठिंबा..

0

अमळनेर (प्रतिनिधी) महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. विविध पक्ष ,सामाजिक संघटना व संस्थांचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे.
जुन्या पोलीस कवायत मैदानावर प्रशासकीय इमारतमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. बसस्थानकाजवळच विविध कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने कामे होऊन शेतकरी बाजार करून सहज परत जाऊ शकतील. बाहेरून येणाऱ्यांसाठी देखील सोयीचे होणार आहे. प्रशासन इमारत गावाबाहेर ५ ते ६ किमी अंतरावर हलविण्याची तयारी करत आहे. यामुळे जनतेचे हाल होणार आहेत. इमारत पोलीस कवायत मैदानाच्या ठिकाणीच व्हावी आणि पोलीसंकडून जागा खाली करून काम लवकर सुरू व्हावे म्हणून बाजार समिती सभापती अशोक पाटील , संचालक समाधान धनगर व विजय पाटील यांनी संचालक व तालुक्यातील शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील ,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ , शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील , खाटीक समाजाचे अध्यक्ष मुक्तार अख्तर खाटीक , मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील , उपाध्यक्ष संजय पाटील ,सचिव विक्रांत पाटील ,एस एम पाटील ,गौरव पाटील , कैलास पाटील ,विलास पाटील , जेष्ठ नागरिक संघाचे श्रावण पाटील , कृष्णा पाटील ,प्रभाकर पाटील अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत ,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकुर तसेच पांडुरंग पाटील ,संजय पाटील ,किरण पाटील , मुन्ना शेख , आर जे पाटील ,महेंद्र रामोसे , मिलिंद पाटील , राहुल बहिरम , विनोद कदम , रवी मोरे , श्यामकांत पाटील ,दिनेश पालवे ,आबिद शेख ,गणेश भामरे , काशिनाथ चौधरी यांनीही सक्रिय पाठिंबा दिला असून १२ जून रोजी जळगाव येथे होणाऱ्या आंदोलनात अनेक जण सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!