कडक उन व वाढत्या तापमानाच्या पार्श्वभुमीवर इ.१ली ते ४थी च्या शाळा १५ जून ऐवजी २जुलै पासून सूरू कराव्यात अशी पालकांची जोरदार मागणी.

प्रतिनिधी -( एरंडोल )
सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता,वादळी पावसाची शक्यता या पार्श्वभुमीवर ‘लहान मुले ही देवाघरची फुले, समजल्या जाणार्या चिमुरड्यांची सुरक्षितता विचारात घेता १५जून ही शाळा उघडण्याची तारीख स्थगीत करून २जुलै पासून शाळा व त्यांचे कामकाज सूरू करावे तर वरच्या वर्गांचे शालेय कामकाज २६जून पासून सूरू करावे अशी मागणी पालकांच्या गोटातून होत आहे.
जळगाव जिल्ह्यात इ. १ली ते १२वी पर्यंत शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या साडेआठ लाखांपर्यंत असावी असा अंदाज आहे तसेच एरंडोल तालुक्यात विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३२ हजारापर्यंत आहे. एकूण शाळांची संख्या १५२ आहे. जि.प.प्राथमिक शाळा, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय या शिक्षण संस्थांचा २०२३ या नविन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ १५जून २०२३ रोजी होणार आहे माञ सद्यस्थिती पाहता लांबलेला मान्सून,उन्हाची वाढती तिव्रता,वादळी पावसाची शक्यता या सार्या बाबींचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे असे जाणकारांचे मत आहे.
विशेषत: इयत्ता १ली ते ४थी पर्यंतच्या चिमुकल्यांची सुरक्षितता राखण्यासाठी शाळा उघडण्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत जिल्हापरीषद शिक्षण विभाग प्रशासनाने नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभाच्या तारखांमध्ये युध्दपातळीवरून बदल करावा अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.