एरंडोल येथे कृषी अधिकाऱ्यांनी केली कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी..

एरंडोल (प्रतिनिधि) येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील कासोदा व एरंडोल येथील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी केली व कुठल्याही परिस्थितीत लिंकिंग, जादा दराने विक्री, काळाबाजारी होणार नाही याची खात्री केली. कुठल्याही प्रकारे अनियमितता आढळल्यास सक्त कार्यवाही करण्यात येईल असा इशारा अधिकाऱ्या कडुन देण्यात आला. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सर्व निविष्ठा योग्य दर्जाच्या व योग्य दरात मिळण्यास अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे व कृषि अधिकारी भरत मोरे यांनी केले आहे.
कृषि केंद्र तपासणी प्रसंगी जिल्हा गुणवता नियंत्रक निरीक्षक जळगाव अरुण तायडे, तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे,पं.स. कृषी अधिकारी,भरत मोरे आदी हजर होते.