अर्बन बँक निवडणुकीत 48.50 टक्के मतदान.. संचारबंदी असली तरी मतदान केंद्र परिसरात होता मुक्त संचार…

अमळनेर (प्रतिनिधि) येथील अर्बन बँकेच्या निवडणुकीत १३ संचालकांच्या पदासाठी ३५ उमेदवारांचे भवितव्य काल मतपेटीत बंद झाले असून ए
कूण 15 हजार 937 मतदारांपैकी केवळ 7 हजार 727 मतदारांचे 48.50 टक्के मतदान झाल्याने शहरातील तणाव व संचारबंदी यामुळे मतदानाची आकडेवारी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
घसरलेल्या मतदानाच्या आकडेवारी मुळे काही मातब्बर उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान काही उमेदवारांनी मतदानाच्या एक दिवस आधीच वाटप सुरू करून मतदारांना लक्ष्मीदर्शन घडविले असताना शहरात रात्री झालेल्या तणावामुळे तणावग्रस्त भागातील मतदार दुसऱ्या दिवशी मतदान केंद्रात फिरकलेच नाहीत.यामुळे उमेदवारही बिथरले होते.दरम्यान सानेगुरुजी विद्यालयात मतदान असल्याने सकाळी 8 वाजता मतदानास प्रारंभ झाला,येथे एकूण २८ केंद्र निर्माण करण्यात आली होती तर प्रत्येक मतदान केंद्रावर ५७० मतदारांची सोय होती. मतदानासाठी १८० कर्मचारी नियुक्त केले होते. सर्वसाधारण आठ जागांसाठी १४ उमेदवार , महिला राखीव दोन जागांसाठी चार उमेदवार , इतर मागासवर्गीय एक जागेसाठी पाच उमेदवार , अनुसुचित जाती जमाती एका जागेसाठी ९ उमेदवार, भटक्या विमुक्त एक जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात ,होते,सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्राबाहेर रांगा लावून उभे असल्याने मतदारांची मतदानासाठी आत जाताना मोठी कसरत होत होती,प्रत्येक जण त्यांना आपल्याला मतदान करण्याची विनंती करीत होता.

मतदान केंद्र परिसरात होता मुक्त संचार,, शहरात
संपूर्ण संचारबंदी असली तरी मतदान केंद्र परिसरात मुक्त संचार असल्याने येथे तणावाचे कोणतेही चित्र दिसून आले नाही, याउलट सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत मतदानाचा वेग जोरातच होता,संपूर्ण परिसरात मोठी गर्दी झाली होती तसेच दुपारी 3 नंतर काही उमेदवारांच्या प्रतिनिधीनी मतदाराना रंगेतच पाकिटे वाटप केली,सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली,अनेकांना आपले क्रमांक मिळत नसल्याने त्यांची धांदल झाली काही जण मतदान न करताच माघारी फिरले,संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता,कोणताही वादविवाद न होता शांततेत मतदान पार पडले . निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही एम जगताप , सुनील महाजन व सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले त्यांना अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत पाटील व संपूर्ण स्टाफ चे सहकार्य लाभले.
इंदिरा भुवनात आज मतमोजणी आज दि ११ रोजी इंदिरा भुवन मध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी ८४ कर्मचारी नियुक्त केले आहेत.