“त्या” बालकांचे हस्तांतरणिय पत्र प्राप्त, लवकरच मुले आपल्या गावी जाणार..

0

जळगाव ( प्रतिनिधि )

कथित बाल तस्करी या आरोपाखाली भुसावळ व मनमाड येथे ५ मौलानाना अटक करून त्यांच्यासह मदरसा शिक्षणासाठी जात असलेले ५९ लहान बालकांना बालकल्याण समिती जळगाव व नाशिक यांच्याकडे त्यांची काळजी घेण्यासाठी सुपूर्द करण्यात आले होते.
त्या ५९ बालकांपैकी २९ बालक हे जळगाव बाल गृह येथे असून त्या २९ पैकी २५ बालके ही बिहार राज्यातील अरारीया जिल्ह्यातील असल्याने त्या जिल्ह्यातून त्या बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल जळगाव बालकल्याण समितीला प्राप्त झाले.
शनिवार १० जूनला बालकल्याण समिती अरारीया यांनी जळगाव बालकल्याण समितीला देखील पत्र देऊन ही २५ मुले त्वरित आमच्या स्वाधीन करा असे पत्र दिलेले आहे.

सरकारी काम व तेही दोन राज्यांमधील असल्याने सुसंवादाने मार्ग काढला- फारुख शेख

३ जून रोजी बाल कल्याण समिती जळगाव ने नैसर्गिक पालकांना बालक स्वाधीन न केल्यामुळे जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी ५ जून रोजी जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल सो यांच्याकडे बाल न्याय कलम २७ नियम १० प्रमाणे अपील करून न्याय मागितला असता माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी अपील मान्य करून लवकरात लवकर समितीने कागदपत्रांची पूर्तता करून या बालकांना अररिया व पूर्णिया जिल्ह्याच्या बालकल्याण समितीला सोपवावे असे आदेश केले होते.
जळगाव बालकल्याण समिती व अररिया बालकल्याण समिती यांच्यामध्ये दुवा होऊन मानियार बीरादारीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी अररियाचे जिल्हाधिकारी श्रीमती इनायत खान, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी बलवीरचंद आणि ओएसडी डी पी साही यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचेशी फॉलोअप करून अरेरिया जिल्ह्यातील एकूण ५० मुलांचे एस आय आर (सोशल इन्वेस्टीगेशन रिपोर्ट) करून घेतले व तसा अहवाल सीडब्ल्यूसी जळगाव व नाशिक ला पाठवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली.
१० जून ला जळगाव मुलांचे पाहिले आदेश प्राप्त

प्रथम जळगाव येथील २५ मुलांची सुटकेचे आदेश १० जूनला संध्याकाळी प्राप्त झाले आहे. ४ मुले ही पुरनिया जिल्ह्यातील असल्याने त्यांचेशी सुसंवाद सुरू आहे लवकरच आदेश प्राप्त होईल.
नाशिक साठी प्रतीक्षा

नाशिक येथील ३० पैकी २५ मुलांचे एस आय आर अहवाल व हस्तांतरणीय पत्र सोमवारी पाठवण्यासाठी अररिया प्रशासन सोबत फारुक शेख हे प्रयत्नशील आहे.
एकूण ९ मुले ही बिहार राज्यातीलच पूर्णिया जिल्ह्यातील असल्याने त्या ९ बालकांचे एस आय आर रिपोर्ट प्राप्त करण्यासाठी सुध्दा प्रयत्न सुरू आहे त्यापैकी जळगाव येथे ४ मुले आहेत तर नाशिक येथे ५ मुलं आहेत.

शेख यांनी मानले यांचे आभार

फारुक शेख यांनी जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल सह जळगाव बालकल्याण समिती चे अध्यक्ष व सभासद,अरारिया चे आमदार अब्दुल रहेमान , जिल्हा दंडाधिकारी श्रीमती इनायत खान,ओएसडी डी. पी. साही, बाल संरक्षण अधिकारी बलवीरचंद व सीडब्ल्यूसी ऑपरेटर सोनी कुमारी यांचे आभार मानले व तसे लिखित मेसेज त्यांना दिल्याचे फारुख शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!