अमळनेर शहरातील दगडफेक प्रकरणी ६१ जणांवर गुन्हे दाखल १२ जून पर्यंत संचारबंदी लागू

अमळनेर( प्रतिनिधि)
शुक्रवारी रात्री दंगल उसळून दोन गटात तुफान दगडफेक झाली. अमळनेरच्या सहायक पोलिस निरीक्षकावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दगडफेकीत तीन अधिकारी व तीन कर्मचारी असे सहा जण जखमी झाले आहेत. ९ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिनगर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख पोलीस ताफ्यासह हजर झाले.
काही वेळात प्रभारी अधिकारी रामदास वाकोडे पारोळा पोलिसांसह हजर झाले तेव्हा दोन्ही गटाच्या हातात लाठ्या काठ्या दगड होते. पोलीस त्यांना शांततेचे आवाहन करीत असताना त्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली आणि पोलिसांवर हल्ला चढवळा इरफान जहुर बेलदार याने तलवारीने राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला त्यांनी तो चुकवला असता त्यांच्या पायाला लागून हाड फ्रॅक्चर झाले.
कादर अली शेरा अली (४०), वसीम खा गुलाब खा (४१), साकीब खा इकबाल खा (४४), रिहान शेख कलीम खाटिक (४२), तौसिफ सईद खाटीक (३८) आकीब खा इकबाल खान (४३), अल्ताफ रफिक पिंजारी (४२), अब्दुल जमीर अब्दुल जब्बार (४२) , अहमदखा अय्यूबखा (४१), भैय्या सुभान पिंजारी (४२), साजिद हुसेन जाकीर हुसेन (४४), दौलत खान मुज्जफर खान (४६), अल्ताफ गुलाम हुसेन (४५), अफरेज जमाल अब्दुल अजीज शेख बेलदार (४१), अब्दुल नबी अब्दुल करीम (४५), अब्दुल रज्जाक अब्दुल गफ्फार (४२), अब्दुल अकील अब्दुल जब्बार (४०), रिजवान शेख सलीम (३५), सईद यासिन खाटीक (४०), कैसर आबिद शेख (३८) यांनी दगडफेक केली त्यात पोलीस उपनिरीक्षक देशमुख, हितेश बेहरे, राहुल पाटील, धुळे आरसीएफ चे अनिल सोनवणे, मगनराव घटे हे कर्मचारी जखमी झाले.तसेच पानखिडकी भागात जाऊन इलेक्ट्रिक डी पी वर व राहिवाश्यांच्या घरावर दगडफेक करून तोडफोड व नुकसान केले आणि विद्युत पुरवठा खंडित केला. त्यांनतर लागलीच खड्डा जीन भागातील एक धार्मिक स्थळावर सुरज चंदुसिंग परदेशी (३८), गोपी विभाकर कासार (४२), कुणाल राजेंद्र भावसार (४३), राकेश राजेंद्र बारी (४१), ईश्वर कैलास लांडगे (४०), लोकेश अनिल ठाकूर (३४), रुपेश हरी पाटील (२८), योगेश कैलास लांडगे (३६), मनोज शशिकांत मराठे (३३), जयेश बबन ठाकरे (३२), राज मलमल जैन (३५), गणेश उर्फ डिब्बा जाधव (३२) यांनी दगडफेक केली लागलीच काही वेळात जुना पारधीवाडा भागात सलीम शेख चिरागोद्दीन उर्फ सलीम टोपी (५४), शकील शेख बबलू नारळवाला (४१), अशपाक उर्फ पक्या सलीम (३४), शोएब सय्यद गुलचंद सय्यद (३२), तोसिफ तार बेलदार (३१), बाबा कुरेशी मुस्तफा (४१), मुन्ना इलियाज खाटीक (३८), तौसिफ अली ताहीर अली (३५), परवेज शकील मिस्त्री (४५), सलीम शेखलाख मिस्त्री (४७), अकबर उस्मान मिस्त्री (४६), सलमत अकबर मिस्त्री (४२), जाकीर हुसेन मोहम्मद हुसेन (४७), अब्दुल करीम अब्दुल रशीद (४५), सद्दामखा गुला खा गफूर शेख (४३), अस्लम शेख मिस्त्री (४५), तौसिफ नूरखान (३५), सुलतान अंडावाला (४२), तन्वीर शेख मुख्तार उर्फ फल्ली (४०), मुजजफ्फर भंगार वाल्याचा भाऊ (४१) पूर्ण नाव माहीत नाही, भाइसाहब चहावाला (५०), मोहसीन जडी बुटीवाला (३८), रफीक उस्मान, कैसर आबीद शेख (४५), जुनेद शेख अरमान शेख (४१) अशांनी जुना पारधी वाडा भागात दगडफेक केली.